श्रीलंकेची सफर
सायलोन / सिलोन म्हणजेच श्रीलंका.
येथील सफर म्हणजे स्वर्लोकीची सफर.
श्रीलंकेची सफर म्हणजे हिरव्या शालीने लपेटलेले डोंगरी दरी. हिरव्या गालिच्यावर नीलमणी जलाशयांनी केलेली कलाकुसर.
श्रीलंकेची सफर म्हणजे रंगी बेरंगी फुलांनी बहरलेली फुलझाडे, वेली आणि orchids. आंबा, फणस, अननस, केळी, पपया, राम्बुतान या वैविध्य पूर्ण फळांनी लगडलेली फळ झाडे . उंच उंच माड आणि त्यांच्या संगतीत रुक्ष कोरफड सुद्धा फुलांनी सजलेली
श्रीलंकेची सफर म्हणजे तमाम पक्षीप्रेमींची चंगळ आणि कितीतरी नाना तऱ्हेचे पक्षी. तेही एकाच ठिकाणी "Yala national park " मध्ये.
श्रीलंकेची सफर म्हणजे दिमाखदार बिबट्याची (leopard) ती सावध चाल आणि बेसावध बछड्या वर धाव. त्याची ती न सुटणारी घट्ट पकड आणि बछड्याची असहाय्य तडफड . भेदरलेल्या मोराची तेथून सर्रकन उडून जाण्याची धडपड आणि इतर पक्षी प्राण्यांनी त्याच वेळेस केलेला तो विलक्षण आक्रोश.
श्रीलंकेची सफर म्हणजे म्हणजे मदोन्मत्त हत्ती (Tusker), त्याची डौलदार family आणि पिल्लाच्या रक्षणासाठी घेतलेला आक्रमक पवित्रा .
श्रीलंकेची सफर म्हणजे देखण्या डौलदार मोराने पिसारा फुलवून केलेले नृत्य, camouflage होणारा monitor lizard, त्याची सर्रकन लवलवणारी जीभ, लांब शेपूट, दगडासारख्या खवल्याची त्वचा.
श्रीलंकेची सफर म्हणजे जलाशयाची कितीतरी रूपे, अथांग सागराचा किनारा, त्यावर अथक अदळणाऱ्या लाटा, आतमध्ये सरसर खेचून नेणारी ती वाळू, त्या लहरींवरचे असंख्य रंग, त्यावर डोलणाऱ्या होड्या, ते लांबवर पसरलेले विषुववृत्त आपल्या कवेत न मावणारे, सागर किनारी वसलेली ती गावे तर कुठे yala सारखी जंगले देखिल.
महावेली , मालवाठू , कला ओया, केलानी सारख्या नद्या,
रावणा धबधब्याची ती भव्यता. ठिकठिकाणी असणारे lakes , गोड्या पाण्याची तळी , lagoons.
श्रीलंकेची सफर म्हणजे इ.स. पूर्वी ४०० ते इ.स.१२०० काळातील Dambulla cave temple मधील विहंगम रंगचित्रे, मूर्ती आणि sleeping Buddha. तो सिगिरिया रॉक. इसवीसन ११०० काळातील Polonnaruwa स्थानी असलेले आत्ताचे ruins, तेथील वास्तुकला ती भव्यता आणि हवीहवीशी शांतता.
श्रीलंकेची सफर म्हणजे निगाम्बो (Negambo), गॉल (Galle) अशी आधुनिक शहरे, Kandi येथील थंड हवेचे ठिकाण तेथील शिरशिरी आणणारी थंडी आणि त्यातच भरभरून बरसणाऱ्या पावसात केलेली भटकंती.
Polonnaruwa, Dambulla , Nuwara Ellya , Yala , Puttalam
या गावातून फिरताना देखील जाणवणारे स्वच्छ smooth रस्ते.
तेथील लाघवी लोक, त्यांचे "अयोबुवान", त्यांची मदत करण्याची वृत्ती,
स्वच्छते बद्दलची आस्था आणि सुरक्षे बद्दलची जागरूकता .
श्रीलंकेची सफर म्हणजे Seyara Holiday resort आणि तेथील सकाळची फेरी, Hotel Mount Villa आणि तेथील kitchen team.
Nuwara Elya चे American star hotel आणि तेथील कडाक्याची थंडी. Yala मधील hotel Pala आणि तेथील संध्याकाळची खमंग भेळ.
हॉटेल New Ocean Hill आणि तेथील backyard चा अथांग सागर,
रात्रीची ती मैफल आणि हो रात्रीच्या पावसातील swimmingचा बेस्ट experience .
श्रीलंकेची सफर म्हणजे डाळ-rice आणि coconut ग्रेव्ही मधील curry असे simple veg जेवण आणि फिश, चिकन ची नॉन-व्हेज मेजवानी.
Pol roti, fruit रोटी, कोथू, होप्पर, स्ट्रिंग होप्पर, दोदोल, मस्कट, खाण्या जोगा सांबार, अशी तिखट गोड variety देखील.
श्रीलंकेची सफर म्हणजे Toyota च्या २९ seater AC बसमध्ये हसतमुख श्री. लाल आणि त्यांचे बाल आणि पाल यांची साथ. आणि हो त्यातील Angel Travels ने खास दिलेली सवलत जेणेकरून इतर जगाशी संपर्क सुटत नाही ते म्हणजे Dialog Network चे Wi-Fi network.
श्रीलंकेची सफर म्हणजे Shopping आणि Shopping.
Blue, Yellow आणि कितीतरी रंगांचे Sapphire, Moon stone आणि विविध Gems, लाकडी हत्ती, masks , fishermen stick , बाटिक prints. kandyan साडी - श्रीलंकन style.
श्रीलंकेची सफर म्हणजे नवीन मित्र मैत्रिणी आणि प्रेरेणा दायी
आशा senior citizensची साथ संगत आणि या नवीन बंधनात गुंफले गेलेलो आम्ही .
सागराने वेढलेल्या या बेटावर भ्रमंती करताना मनावर पडलेले
impression हे शब्दात व्यक्त करू शकले ते केवळ या team impression मुळे .